सलाम भाईयो सबको सलाम..
नळ स्टॉप वरच्या किडया-मुंग्यातल्या गर्दीला सलाम..
त्या गर्दीतूनही two wheeler काढणाऱ्याला सलाम..
PMT two wheeler सारखी चालवणाऱ्याला सलाम..
आणि त्या PMT खाली चिरडल्या जाणाऱ्याना सलाम..
सलाम भाईयो सबको सलाम..
चिकचिक पावसात भाजी विकणाऱ्याला सलाम..
तशातही नेटाने भाजी घेणारीला सलाम..
Office मध्ये मरमर मरूनही घरी gas पुढे घाम गाळणारीला सलाम..
आणि त्याच चवीचा तोच बटाटा रोज बिनतक्रार खाणाऱ्याला सलाम..
सलाम भाईयो सबको सलाम..
नियमितपणे बंद पडणाऱ्या लोकल ला सलाम..
गर्दीतल्या घामेजलेल्या नजरांना सलाम...
अगला स्टेशन दादर म्हणणारीला सलाम..
आणि मृत्यूची वाट पाहत दाराशी लोंबकळणाऱ्याला सलाम...
सलाम भाईयो सबको सलाम...
रस्त्याच्या कडेला संसार थाटणारीला सलाम...
तिच्याकरता रोज एक वडापाव आणणाऱ्या तिच्या नवऱ्याला सलाम..
अशातही मुलं होऊ देण्याच्या धाडसाला सलाम..
आणि उघड्यावर वाढलेल्या मुलाच्या काटक शरीराला सलाम..
सलाम भाईयो सबको सलाम...
दारची घाण साफ करणाऱ्या कचरेवालीला सलाम..
तिलाही शिव्या देणाऱ्या समाजाला सलाम..
त्या शिव्या ऐकून न ऐकल्यासारखं करणाऱ्या high standard लोकांना सलाम..
आणि अन्यायाला प्रतिकार न केल्याचं शल्य न बाळगता गाढ झोपणाऱ्या समाजाला सलाम...
सलाम भाईयो सबको सलाम...
हरवत चाललेल्या माणुसकीला सलाम..
भावाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसणाऱ्याला आजच्या अर्जुनाला सलाम..
बाहेर अनाचार करून घरी गीता घोकणाऱ्याला सलाम...
आणि इतका व्यभिचार बघूनही गीता सांगत राहणाऱ्या कृष्णाला सलाम...
सलाम भाईयो सबको सलाम.....
-ASHUTOSH PUROHIT
- Inspired by Mangesh Padgoankar's "Salaam Bhaiyo Sabko Salaam"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा